उत्पादीत वस्तूंना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे; शिवसेना ‘प्रथम ती’ महिला संमेलनाचे शानदार उद्घाटन


परभणी, ता.१०
'बचत गटांना पथसंस्थेमार्फत सुलभ दरात  कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे या संधीचा फायदा महिला बचत गटांनी घेतल्यानंतर उत्पादित केलेल्या वस्तुंना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी केले़ 
आ.डाॅ.राहूल पाटील यांच्या पुढाकाराने   येथील  ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर शिवसेना 'प्रथम ती' या महिला संमेलनात त्या बोलत होत्या. उद्घाटन ज्योती ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजिका कमलाताई परदेशी ,आ.डाॅ.राहूल पाटील,  शिवसेना महिला जिल्हा संपर्क प्रमुख शिल्पा सरपोतदार,  अंबीका डहाळे, सखूबाई लटपटे, समप्रिया राहुल पाटील, सहसंपर्क प्रमुख  डॉ़ विवेक नावंदर, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, सदाशिव देशमुख, ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, की महिलांनी बचत गटा संदर्भात अनेक अडचणींना सामोरे जात त्यावर मात केली आहे़. महिलांसाठी आजचा हा सन्मानाचा दिवस आहे़ .महिलांसाठी नवे दालन त्या निमित्ताने खुले झाले आहे़. तुलनेने महिला प्रामाणिक असतात. संस्कार आणि संस्कृती टिकवण्याचे काम महिला करतात़ शिक्षण, सुरक्षा, स्वास्थ्य , स्वावलंबन, समता या  पंचसुत्रीचा अंगीकार करावा ,असे आवाहन यावेळी बोलतांना केले़.

प्रास्ताविकात आ.डाॅ.राहूल पाटील यांनी परभणी पासूनच ‘प्रथम ती’ या महिला संमेलनास प्रारंभ होत असल्याने, या बद्दल आनंद व्यक्त करत महिला बचत गटाच्या चळवळीस मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे़. बचत गटांना पथसंस्थेमार्फत सुलभ दरात  कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे़ या संधीचा फायदा महिला बचत गटांनी घ्यावा तसेच महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी ग्वाही दिली. महिलांचे रोजगारातून जीवमान उंचावणार आहे़. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा व अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने परभणी विधानसभा मतदार संघातील महिला बचत गटांचा महामेळावा आयोजीत करण्यात आला आहे़. यात महिला स्वावलंबी बनाव्यात यासाठी हे संमेलन प्रेरणादायी ठरेल असा विश्वास  आ.डाॅ.राहूल पाटील यांनी व्यक्त केला़. यावेळी शिवसेना महिला जिल्हा संपर्क प्रमुख शिल्पा सरपोतदार सदर महिला संमेलन हे भव्य दिव्य ठरणार असल्याचे सांगीतले.  'इतनी हमे शक्ती देना दाता..' हे प्रेरणादायी गीत सादर केले. यावेळी बोलतांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे पुढे म्हणाल्या की,  कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन मनिषा उमरीकर यांनी केले. या मेळाव्यास शहरी व ग्रामीण भागातील सुमारे दहा हजार महिला व माता भगीनी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments