स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण),

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), 



जिल्हा परिषद परभणी. महाविद्यालयीन युवकांनी अभिप्राय नोंदवावा - प्राचार्या डॉ.संध्याताई दुधगावकर परभणी, (ता.१३)- केंद्र शासनाच्या वतीने सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ या अभियानात जिल्ह्यातील महाविद्यालयीन युवकांनी आपले अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्याताई दुधगावकर यांनी केले. 


यावेळी डॉ.संध्याताईंनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत मोबाईलद्वारे अभिप्राय नोंदविला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विभाग प्रमुख डॉ.श्री डी. टी.इबतवार, स्वच्छ भारत मिशनचे संवाद तज्ज्ञ श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांची उपस्थिती होती. सदरचा अभिप्राय नोंदविण्यासाठी मोबाईलच्या प्ले स्टोअर या पर्याया मधील SSG2019 हे मोबाईल अँप्लिकेशन इन्स्टॉल करून अभिप्राय नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 

जिल्ह्यातील महाविद्यालयीन युवक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह नागरिकांनी अभिप्राय नोंदविणे आवश्यक आहे. सद्यस्थितीमध्ये परभणी जिल्ह्याने एकूण 24047 एवढे अभिप्राय नोंदविले आहेत. 

Post a Comment

0 Comments